Sunday, May 4, 2008
राजचा हल्लाबोल
राजचा हल्लाबोल
कुठेही मराठी माणसावर अन्याय होताना दिसला तर तुमचं रक्त सळसळलं पाहिजे. माझ्या आदेशाची वाट पाहू नका. अन्याय दिसेल तिथे लाथ मारा. का ? .... तर आपल्याला मराठी माणसांचं भलं करायचं आहे... , असं सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे हल्लाबोलचा आदेश दिला. मराठीच्या मुद्द्यावर आपल्याला विरोध करणा-यांवर थेट हल्ले, प्रक्षोभक भाषा, राज्यभरातून आलेल्या तरुणांची गर्दीचा त्याला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरची दुसरी सभा यशस्वी ठरली.माझ्या मराठी बंधू, भगिनी आणि मातांनो, अशी सुरुवात होताच भाषणाचा अजेंडा भय्या हाच असणार हे निश्चित झालं. ' उत्तर प्रदेश तो झांकी है , महाराष्ट्र अभी बाकी है ', अशा घोषणा देणा-या भैय्यांची औकात काय ? अडीच हजार मैलावरून येऊन इथे दादागिरीची भाषा करायची नाय... राहायला देतो हेच उपकार समजा.. अबू आझमी , तू २० हजार माणसं आणच , जाताना फक्त ४० हजार पाय जातील. तुमची मस्ती अशीच सुरू राहिली तर शिवाच्या महाराष्ट्राला तिसरा डोळा उघडावा लागेल , असा सज्जड इशाराही त्यांनी दिला आणि मनसे कार्यकर्ते पुन्हा पेटले. भय्या हा शब्द असलेलं प्रत्येक वाक्य टाळ्या घेऊन गेलं.
मराठी भाषेचा आणि मराठी माणसाच्या अस्तित्त्वाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर , जवळपास महिन्यानं राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार असल्यानं त्यात ते काय बोलणार , याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अपेक्षेप्रमाणे त्यांनी मराठी माणूस , मराठी भाषा आणि महाराष्ट्राचं अस्तित्व या भावनिक मुद्यांनाच हात घातला आणि उत्तर भारतीय नेत्यांवर ठाकरी शैलीत टीका केली.
पेटलेला , चवताळलेला आणि स्वाभिमानानं उठलेला मराठी माणूस पाहून शिवरायांनाही आनंद झाला असेल , अशीच आपल्या भाषणाची सुरुवात करून राज यांनी आपल्या कार्यकर्त्यांना खूष केले. त्यानंतर हिंदी आणि इंग्रजी प्रसारमाध्यमांचा साभिनय समाचार घेऊन त्यानं उत्तर भारतीय नेत्यांकडे आपला मोर्चा वळवला. ' यांचा मुंबई-महाराष्ट्र ताब्यात घ्यायचा डाव मी उधळून लावला म्हणून हे चवताळले . असं मी काय बोललो ? चालते व्हा म्हणून बोललोय ? अजून बोललेलो नाही. पण तुमची दादागिरी अशीच सुरू राहिली तर तसंच सांगावं लागेल. आम्हाला काय च्यु... समजला का ? कुणीही यावं आणि टपली मारून जावं..
हे महाराष्ट्र सहन करणार नाही ', असं त्यांनी ठणकावून सांगितलं. अमरसिंग यांचा उल्लेख तर त्यांनी बेडूक , बच्चन कुटुंबाचा प्रवक्ता असा केला. बाटली प्रकरण , जया बच्चन यांचं राज ठाकरेंना ओळखत नसल्याचं वक्तव्य , अमिताभ यांच्याबद्दलची जुनी विधानं , या सगळ्याचाच त्यांनी पंचनामा केला.
राज्यघटना लिहिणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे होते. त्यामुळे आम्हाला कुणी राज्यघटना शिकवण्याचा शहाणपणा करू नये. राहायला देतो हेच उपकार समजा. इथे जे काय मतभेद आहेत, ते आमचं आम्ही बघून घेऊ, असंही त्यांनी सुनावलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५५ साली लिहिलेल्या एका पुस्तकातील उताराच त्यांनी वाचून दाखवला. उत्तर भारताचं वर्चस्व राष्ट्रीय ऐक्याला घातक असल्याचं मत बाबासाहेबांनी त्यावेळी नोंदवलं होतं, मग मी आत्ता काय चुकीचं बोललो, असा सवाल त्यांनी केला, तेव्हा राजच्या जयजयकाराच्या घोषणा घुमल्या. आपल्या सोसायटीच्या मैदानात आपण बाजूच्यांना येऊ देत नाही, मग माझ्या महाराष्ट्राच्या सोसायटीत मी भय्यांना का येऊ देऊ ?, असंही ते म्हणाले. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी १०५ जणांनी हौतात्म्य पत्करलं, ते काय भय्यांच्या गोठ्यात बांधण्यासाठी नाही, असं त्यांनी बजावलं. महाराष्ट्रात फक्त महाराष्ट्र दिनच साजरा होणार, त्यासाठी मला कितीही दिवस तुरुंगात जावं लागलं तरी चालेल, ही गर्जना तर लाखोंच्या जमावानं डोक्यावर घेतली.
मात्र त्याचवेळी, त्यांनी मराठी माणसाच्या मुळमुळीत वृत्तीवरही टीका केली. भुसभुशीत जमिनीतच घुशी होतात. त्यामुळे मराठी माणूस ज्या दिवशी दक्षिणेतल्या माणसाइतका कडवट होईल, आपल्या भाषेबद्दल अभिमान बाळगेल, तेव्हाच त्याचं अस्तित्व टिकू शकेल. असेल हरी तर देईल खाटल्यावरी, असा विचार सोडून द्या. तुम्हाला किती वेळा पेटवायचं. १९२२ साली प्रबोधनकारांनी हेच लिहिलं होतं, ६६ साली बाळासाहेबांनी तेच केलं, आत्ताही हे सगळं मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी चाललं आहे. शिवरायांनी मालोजी घोरपडे यांना पत्र लिहून मराठी सैन्यात सामील होण्यास सांगितलं होतं. मराठीयांचे गोमटे घडवायचे आहे, असं आवाहन त्यांनी केलं होतं. आपल्यालाही आता तेच करायचंय, म्हणून गाफील राहू नका, अन्याय दिसेल तिथे लाथ मारा, असा आदेशच त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
राज ठाकरे ...
महाराष्ट्राचे गोमटे करतील ...
Thursday, May 1, 2008
3 may नवनिर्माण होणारच
हाराष्ट्रात नवनिर्माण होणारच-राज ठाकरे
एक माणुस शिवाजी पार्क खचाखच भरवु शकतो
मित्रहो,
राज ठाकरे - एक धगधगते, बंडखोर व्यक्तिमत्व. पण त्याच्या बंडखोरीला एक वेगळाच सुगन्ध आहे. त्यामधे इतरान्सारखा स्वार्थ इन्चभरही दिसत नाही. अन्याय आणि फ़क्त अन्यायामुळेच शिवसेनेतून बाहेर पडलेल्या या मराठी युवकास मराठी माणसासाठी खरेच काहीतरी मनापासून करण्याची धडपड, उर्मी आहे.
समर्थकान्च्या "आगे बढो, हम तुम्हारे साथ है", या सादेला राजने ओ दिलेली आहे आणि त्याच्या धर्मनिरपेक्ष पक्षाची विजयी घौडदौड सुरूही झालेली आहे.
राजच्या स्वप्नातला महाराष्ट्र सर्वसामान्यान्च्या स्वप्नातल्या महाराष्ट्रापेक्षा वेगळा नक्कीच नसणार, याची आम्हाला खात्री आहे. आणि म्हणूनच मित्रान्नो, महाराष्ट्राच्या नवनिर्माण प्रक्रियेचे उगमस्थान, आशास्थान, श्रध्दास्थान, स्फुर्तीस्थान असलेल्या या अस्सल मराठी युवा नेत्याला आपण खारीच्या वाट्याने का होईना - मदत करू शकतो, नाहीच जमले तर पाठीबा तरी नक्कीच देऊ शकतो.
तोन्ड वाजवुन न्याय मिळत नसेल तर
तोन्डात वाजवुन न्याय मिळवा,
पण न्याय हा झालाच पाहिजे.
एक अस व्यक्तिमत्व कि ज्याची ओळख करुन देण्याची गरज नाहि. अख्खे
एक माणुस शिवाजी पार्क खचाखच भरवु शकतो
मित्रहो,
राज ठाकरे - एक धगधगते, बंडखोर व्यक्तिमत्व. पण त्याच्या बंडखोरीला एक वेगळाच सुगन्ध आहे. त्यामधे इतरान्सारखा स्वार्थ इन्चभरही दिसत नाही. अन्याय आणि फ़क्त अन्यायामुळेच शिवसेनेतून बाहेर पडलेल्या या मराठी युवकास मराठी माणसासाठी खरेच काहीतरी मनापासून करण्याची धडपड, उर्मी आहे.
समर्थकान्च्या "आगे बढो, हम तुम्हारे साथ है", या सादेला राजने ओ दिलेली आहे आणि त्याच्या धर्मनिरपेक्ष पक्षाची विजयी घौडदौड सुरूही झालेली आहे.
राजच्या स्वप्नातला महाराष्ट्र सर्वसामान्यान्च्या स्वप्नातल्या महाराष्ट्रापेक्षा वेगळा नक्कीच नसणार, याची आम्हाला खात्री आहे. आणि म्हणूनच मित्रान्नो, महाराष्ट्राच्या नवनिर्माण प्रक्रियेचे उगमस्थान, आशास्थान, श्रध्दास्थान, स्फुर्तीस्थान असलेल्या या अस्सल मराठी युवा नेत्याला आपण खारीच्या वाट्याने का होईना - मदत करू शकतो, नाहीच जमले तर पाठीबा तरी नक्कीच देऊ शकतो.
तोन्ड वाजवुन न्याय मिळत नसेल तर
तोन्डात वाजवुन न्याय मिळवा,
पण न्याय हा झालाच पाहिजे.
एक अस व्यक्तिमत्व कि ज्याची ओळख करुन देण्याची गरज नाहि. अख्खे
Subscribe to:
Posts (Atom)