Wednesday, September 17, 2008

पाट्या महाग की, दुकाने ते ठरवा!

मराठी भाषेतल्या पाट्या महागड्या असल्याचा युक्तिवाद मॅकडोनाल्डसारख्या कंपन्या करतात. पण पाट्या महागड्या की, दुकाने महागडी याचा विचार दुकानदारांनी करावा. मराठी भाषेत पाट्या लावल्या नाहीत, तर त्यांचे परिणाम भोगायची तयारी ठेवा, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी दिला. मराठी भाषेवर आक्षेप असेल तर तो महाराष्ट्रदोह ठरेल, असे ते म्हणाले.

मराठीत पाट्या लावण्यासाठी मनसेेने दिलेली मुदत २८ ऑगस्टला संपत आहे. मराठी पाट्यांसाठी दिलेली मुदत व भोईवाड्यातील गावठाणाच्या विकासाच्या मुद्यावर राज यांनी पालिका आयुक्त डॉ. जयराज फाटक यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत आमदार बाळा नांदगावकर, मंगेश सांगळे, अरविंद गावडे होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राज म्हणाले की, मराठीतल्या पाट्या म्हणजे दुकानाच्या नावाचा अनुवाद नाही, असे स्पष्ट करताना ते म्हणाले की, देवनारी लिपीमध्ये पाट्या असल्या पाहिजेत. भाजपचे सरकार असलेल्या कर्नाटकमध्ये कन्नड येत नाही म्हणून मराठी आमदाराला मंत्रिपदापासून लांब ठेवले जाते. भाषेबद्दलचा प्रश्न इतर राज्यात विचारला जात नाही. चेन्नईमध्ये बीएमडब्ल्यू कपंनीत आलेल्या परदेशी तंत्रज्ञाना तामिळ भाषा शिकावी लागते. इतर राज्यांत भाषेच्या प्रश्नावर कोणीही ब्र काढत नाही. मराठी सोडून अन्य भाषांना सामावून घेण्याचा मक्ता काय महाराष्ट्रानेच घेतला आहे काय, असा सवाल त्यांनी केला.

1 comment:

Sharvani Khare - Pethe said...

नुकतच माझा वाचनात आल की पंजाब मधे सर्व शाळांमधे पंजाबी भाषा compulsory केली आहे.

नेहमी मराठी माणसानेच का सामोपचाराने घायचे?

कर्नाटक मधे गजरे विकणारी बाई हिंदी येत नाही म्हणून आत वारे करून बोलताना दिसते... तिच बाई मुंबई ला आली की कशी चुरू चुरू हिंदी बोलायला लागते. ह्याचे कारण - कर्नाटकात व ईतर कोठेही मात्रुभाषाच बोलली जाते. मग महाराष्टामधे मराठी का नाही???