Thursday, September 25, 2008

मराठी पाट्यांसाठी राजचा वॉर्निगबोर्ड

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील दुकानादारांना दुकानांवर मराठी पाट्या लावण्याच्या २८ ऑगस्टच्या डेड लाइनला केवळ सात दिवस शिल्लक असल्याचे फलक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दादर भागात लावले.
महाराष्ट्रातील विशेषतः मुंबईतील दुकानांवर मराठी पाट्या २८ ऑगस्टच्या आत लावाव्यात नाही तर वेगळ्या भाषेत सांगण्यात येईल, असा इशारा राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यांच्या या इशा-याची आठवण करून देण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दादर परिसरात 'फक्त सात दिवस शिल्लक' अशा आशयाचे फलक ठिकठिकाणी लावले आहे.
दुकानाच्या पाटीसाठी पाच हजाराचा खर्च येईल, पण मराठी पाटी लावली नाही तर मग परिणामांना दुकानदारांनी सामोरे जावे. पाटीसाठी खर्च करावा की दुकानासाठी हे दुकानदारांनीच ठरवावे, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.
नेत्याच्या चेतावणीची आठवण करून देण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आणि त्यांनी फलक लावण्याचे काम सुरू केले आहे.

No comments: